अस्‍मायर’च्‍या दुस-या फेरीला विद्यार्थ्‍यांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

0

63 शाळांमधील 1076 विद्यार्थ्यांनी दिली प्रज्ञा शोध परीक्षा

सोमलवार एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित स्‍व. अण्णासाहेब सोमलवार मेमोरियल इनिशिएटिव्ह ऑफ रिवॉर्डिंग एक्सलन्स (अस्‍मायर) – 2024 या बौद्धिक प्रज्ञा शोध स्‍पर्धेच्‍या दुस-या फेरीत 63 शाळांमधील 1076 विद्यार्थ्यांनी सहभागी होत उत्‍स्फूर्त प्रतिसाद दिला. सोमलवार निकालसमध्‍ये ही दुसरी फेरी रविवारी पार पडली.
इयत्ता 7 ते 10 साठीच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी असलेल्‍या या प्रज्ञा शोध स्‍पर्धेची प्राथमिक फेरी संबंधित शाळांमध्ये पार पडली होती. त्‍यात 79 शाळांमधील 24000 हून अधिक विद्यार्थी सहभाग झाले होते. त्‍यातून 1079 विद्यार्थ्‍यांची दुस-या फेरीसाठी निवड करण्‍यात आली होती.
आता दुस-या फेरीतून अंतिम फेरीसाठी प्रत्‍येक वर्गातील पहिल्‍या 10 विद्यार्थ्‍यांची निवड केली गेली आहे. या विद्यार्थ्‍यांची तिसरी व अंतिम फेरी येत्‍या, 19 डिसेंबर रोजी होणार आहेत. अंतिम फेरीतील विजेत्‍यांचा बक्षिस वितरण सोहळा संस्‍थेच्‍या स्‍थापन दिनी म्‍हणजेच येत्‍या, 26 डिसेंबर रोजी आयोजित करण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांची प्रमुख उपस्‍थ‍िती राहणार आहे, असे आयोजकांनी कळवले आहे.