अमरावती (Amravati):बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचार विरोधात अमरावती शहरात निषेध मोर्चा व सभेचे आयोजन करण्यात आले होते. अमरावती शहरातील जयस्तंभ चौकामधील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करत निषेध मोर्चाला सुरुवात झाली. यानंतर तसेच मोर्चाचे रुपांतर राजकमल चौकात सभेत झाले. तत्पूर्वी या मोर्चा अमरावती शहराचा जिल्हाभरातून मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटना, भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी विविध फलकाच्या माध्यमातून हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराचा विरोध आणि निषेध करण्यात आला. बांग्लादेशमध्ये हिंदू सुरक्षित नाही, त्यामुळे बांगलादेश सरकारने 15 सेकंद साठी त्यांची बॉर्डर उघडावी या 15 सेकंदात त्यांची लायकी व औकात आम्ही दाखवून देऊ असा इशारा माजी खासदार नवनीत राणा(Navnit Rana) यांनी यावेळी दिला आहे. आमच्या भारत देशात एक शेर जिवंत आहे हा शेर बांग्लादेशची सफाई करेल असा नवनीत राणा यांनी यावेळी म्हणाल्या आहेत.