शेवटच्या व्यक्तीला लाभ मिळेल, असा हा अर्थसंकल्प -सुधीर मुनगंटीवार

0

 

नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला 2047 पर्यंत विश्वगुरू करण्याच्या दृष्टीने जो संकल्प घेतला, त्या दृष्टीने आजचा अर्थसंकल्प आहे. याचा शेवटच्या व्यक्तीलाही लाभ मिळेल, असा हा अर्थसंकल्प आहे असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मुनगंटीवार म्हणाले, यापूर्वी विरोधकांनी कोणते दिवे लावले? ते सांगावे मग विरोध करावा. देशात 36 लक्ष कोटी रुपये वितरित केले. 1 कोटी लोकांना सोलरमार्फत वीज मिळेल. तिसरी इकॉनॉमी होईल.
2013 मध्ये विरोधकांनी बजेटमध्ये काय दिले होते? देशाची किती प्रगती केली? संयमाने बसले तर दोन मते विरोधकांना जास्त मिळतील असेही ते म्हणालेत. राज ठाकरे नाशिक दौरा संदर्भात बोलताना प्रत्येक पक्षाला अधिकार आहे. मोर्चे बांधणी केली पाहिजे. मात्र, काँग्रेससाठी शेवटची निवडणूक आहे. 2024 चे खाते वाटप झाले होते. आता त्यांचे आपसात भांडण सुरू झाले. कदाचित त्यांनाही महायुतीत यायची इच्छा झाली असेल, कदाचित भाजपमध्ये गेलो तर क्लीन चीट मिळेल, असं उद्धव ठाकरे यांना वाटत असेल असेही एका प्रश्नाच्या उत्तरात सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

 

व्हेज पनीर शाश्लिक सिझलर | Veg Paneer Shashlik Sizzler Recipe | Shankhnaad News