Home Breaking news रवींद्र सिंघल नागपूरचे नवे पोलिस आयुक्त

रवींद्र सिंघल नागपूरचे नवे पोलिस आयुक्त

0

(Nagpur)नागपूर : राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून नागपूरचे (Commissioner of Police Amitesh Kumar) पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे आता पुण्याचे नवे पोलिस आयुक्त राहणार आहेत. तर नागपुरात (Ravindra Kumar Singhal)रवींद्रकुमार सिंघल हे नवे पोलिस आयुक्त म्हणून सूत्रे स्वीकारणार आहेत. गृहविभागाने बदल्यांचे आदेश काढले आहेत.

रवींद्र सिंघल हे सध्या वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक आहेत. सिंघल यांनी नागपुरात यापूर्वीही विविध पदांवर काम केले आहे. (Sandeep Patil, Deputy Inspector General of Police, Gadchiroli Division)गडचिरोली विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांना पदोन्नती मिळाली असून आता ते नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून म्हणून काम करतील.

(Amravati Police Commissioner N.D. Reddy)अमरावतीचे पोलिस आयुक्त एन.डी. रेड्डी यांनाही पदोन्नती मिळाली असून ते तेथेच पोलिस आयुक्त म्हणून नियुक्त राहतील. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल हे पदोन्नतीवर गडचिरोली परिक्षेत्राचे विशेष उपमहानिरीक्षक म्हणून येणार आहेत. नागपुरात कार्यरत असलेले पोलिस उपायुक्त एम. सुदर्शन हे चंद्रपूरला पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेले पंकज कुमावत हे अमरावती ग्रामीणचे अपर पोलिस अधीक्षक म्हणून येत आहेत. नागपूर ग्रामीणचे अपर पोलिस अधीक्षक संदीप पखाले यांच्याकडे पोलिस अधीक्षक विशेष कृती गट नक्षल विरोधी अभियान ही जबाबदारी देण्यात आलीय. तर अमरावती ग्रामीणचे अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांची मुंबईला बदली झाली आहे.