यंदा हेल्मेट सक्तीमुळे मृत्यूंच्या प्रमाणात घट

0

 

(Gondia)गोंदिया – अपघात म्हटला की, सर्व सामान्य जनतेच्या अंगावर एकदम शहारा येतो. मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. यामध्ये अनेक कुटुंब उध्वस्त होत असल्याचे आपणास दिसून येते. गोंदिया जिल्ह्याचा विचार केला असता गोंदियाच्या लगतचं राष्ट्रीय महामार्ग आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक राज्य मार्ग, महामार्गावरूनही प्रवास करत असतात. यात मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. मात्र, यावर्षी गोंदिया जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. याला कारणही तसेच आहे, गोंदिया जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात आल्यामुळे अपघाताच्या प्रमाणामध्ये आणि मृत्यूच्या प्रमाणामध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे.

गोंदिया जिल्ह्यात गेल्या 2023 या आर्थिक वर्षामध्ये 268 अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये 145 नागरिक मृत्यू पावले असून 199 हे जखमी झाले असल्याचे दिसून आले आहे. याच्या मागील वर्षीच्या तुलनात्मक अभ्यास केला असता, मागील वर्षी म्हणजेचं 2022 मध्ये 255 अपघात झाले असून यामध्ये 156 मृत्यू पावले आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र, यावर्षी गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हेल्मेट सक्ती करण्यात आल्याने, यावेळी मात्र मृत्यूचे प्रमाण कमी झाले असल्याचे आढळून आले आहे.

नागरिकांनी दुचाकीने प्रवास करीत असताना हेल्मेटचा वापर करावा, तसेच कर्कश आवाजामध्ये किंवा मोठ्या प्रमाणात स्पीड ने वाहन चालणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी पोलीस विभागाने आता अशा नागरिकांचे फोटो किंवा व्हिडिओ वाहतूक पोलिसांना पाठवावे, जेणेकरून त्यांच्यावर कारवाई करण्यास सोयीस्कर होईल, असे आवाहन पोलीस विभागात करण्यात आले आहे. आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस विभागाद्वारे करण्यात आले आहे.