शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा

0

 

(Gondia)गोंदिया– गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत येत असलेल्या गंगाबाई रुग्णालय येथे जिल्ह्यातील एकमात्र शासकीय रक्तपेढी असून, मात्र या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांना रक्त मिळत नसल्याने रुग्णांना बाहेरून खाजगी रक्तपेढीतून रक्त विकत घेऊन यावे लागत आहे. शासकीय रक्तपेढीत पब्लिक रिलेशन ऑफिसर या पदाची जागा सुद्धा रिक्त आहे.

त्यामुळे अनेकांना रक्तापासून वंचित राहावे लागत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी महिलांना मोठ्या प्रमाणात प्रसूती दरम्यान रक्ताची आवश्यकता भासते. गोंदिया जिल्हाधिकारी यांनी या संबंधित विभागाला आणि जिल्ह्यातील अनेक सेवाभावी संस्था यांच्यासोबत चर्चा करून जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये याकरिता शिबिर आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.