इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानाचे पंख एकमेकांना घासले

0

पश्चिम बंगालच्या कोलकाता विमानतळावरील घटना

कोलकाता (Kolkata ), 27 मार्च  : पश्चिम बंगालच्या कोलकाता विमानतळावर आज, बुधवारी इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांचे पंख एकमेकांना घासल्याची घटना घडली. इंडिगोचे विमान टॅक्सीवेवरून जात असताना विमानाचा काही भाग एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानाला धडकला. सुदैवाने या अपघातात कोणतेही नुकसान झालेले नाही.

यासंदर्भात एअर इंडिया एक्सप्रेसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमचे एक विमान कोलकाता विमानतळाच्या धावपट्टीवर चेन्नईला जाण्यासाठी क्लिअरन्सची वाट पाहत होते. यावेळी, इंडिगो विमान कंपनीच्या विमानाच्या पंखांची टोक त्याच्यावर आदळले होते. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आम्ही नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) आणि विमानतळ प्राधिकरणाला सहकार्य करत आहोत. या अपघातामुळे प्रवाशांची गैरसोय झाली याबद्दल आम्ही दिलगीर असल्याचे त्यांनी सांगितले. या अपघातानंतर डीजीसीएने इंडिगो एअरलाइन्सच्या वैमानिकांवर कारवाई केली आहे. विमान वाहतूक कंपनीच्या या वैमानिकांना या एका दिवसाचा पगार मिळणार नाही. एअरलाइन्स उद्योगात ‘रोस्टर्ड ऑफ’ अंतर्गत कर्मचाऱ्यांचे कामाचे दिवस मोजले जात नाहीत आणि त्या दिवशी त्यांना पगारही मिळत नाही. याअंतर्गत डीजीसीएने इंडीओच्या पायलटवर कारवाई करण्यात आली आहे.