अमरावतीकरांने पाणी जपून वापरा
शहराला ८ तारखेपर्यंत पाणी पुरवठा नाही

0

अमरावती. अप्पतर वर्धा धरणातून (Upper Wardha Dam ) शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी रविवारी फुटली. या जलवाहिनीच्याी दुरुस्तीचे काम हाती घेण्याात आले असून यामुळे बडनेरासह अमरावती शहराचा पाणीपुरवठा ८ डिसेंबरपर्यंत बंद (Water supply to Badnera and Amravati city stopped) राहणार आहे. यामुळे नागरिकांचे पाण्याविना हाल होण्याची शक्यता आहे. बोरगाव धर्माळेनजीक (Near Borgaon Dharmale) अप्परवर्धा धरणाची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. परिसरात तलावसदृश स्थिती निर्माण झाली असल्याने दुरूस्तीतही अडथळे येत आहे. जीवन प्राधिकारणाचे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार घटनास्थळी पोहचले असून जलवाहिनीच्या आजूबाजूला साचलेले पाणी काढण्याचे काम सर्वप्रथम हाती घेण्या त आले आहे. किमान पाच दिवस दुरुस्तीला लागणार असल्याने ८ डिसेंबरपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची सूचना विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
अप्पयर वर्धा धरणातून शहराला पाणीपुरवठा करणारी १५०० मिमी. व्यासाची मोठी जलवाहिनीला रविवारी गळती होऊन ती फुटली. त्यामुळे पाण्याचा अपव्यय सुरू होता. आजूबाजूला तलावसदृश स्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार बोरगाव धर्माळे येथे पोहचले. मात्र पाणी साचल्याने दुरुस्तीसाठी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याव होत्या . किमान पाच दिवस दुरुस्तीला लागणार असल्याचा अंदाज आहे. ९ डिसेंबरला पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र पाच दिवस पाण्यासाठी अमरावतीकरांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पत्रानुसार, अमरावती पाणीपुरवठा योजनेच्या १५०० मिमी व्यासाच्या नेरपिंगळाई ते येथील तपोवन परिसरातील जलशुद्धिकरण केंद्रापर्यंत असलेल्या पी.एस.सी. गुरुत्ववाहिनीवर नागपूर महामार्गावरील बोरगाव फाटा (ड्रिम्जलॅंड) जवळ मुख्य जलवाहिनी रविवारी फुटली आहे. या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून, ती दुरुस्तीकरिता अमरावती, बडनेरा शहरांचा पाणीपुरवठा चार दिवस बंद ठेवावा लागणार आहे. ५ ते ८ डिसेंबर या चार दिवसांच्या कालावधीत रात्रंदिवस जलवाहिनीच्या गळतीचे काम चालणार आहे. अचानक पी.एस.सी गुरुत्ववाहिनीवरील पाइप लाइन फुटल्याने नागरिकांना चार दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मजीप्राने केले आहे.