आम्ही कायम जमिनीवर चालणारे लोक आहोत-फडणवीस यांचा पवारांना टोला

0

मुंबई : सत्ता आल्यानंतर नेत्यांनी जमिनीवर राहिले पाहिजे. मात्र काही जण टोकाची भूमिका घेतात, हवेत उडतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तुरुंगात घालीन, जामीन रद्द करीन, अशी विधाने करणे ही काही राजकीय नेत्यांची कामे नाहीत, पण इतकी टोकाची भूमिका काही राजकीय नेत्यांनी घेतली आहे, असेही पवार म्हणाले होते. या टिकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis on Sharad Pawar) प्रत्युत्तर देत आम्ही जमिनीवर चालणारे लोक असून आम्हाला आमची जमीन माहिती असल्याचे सांगितले. हवेत नेमके कोण आहे, हे देखील तपासले पाहिजे, असा टोलाही त्यांनी पवारांना लगावला. यावेळी सीमावादाबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, सीमा वादावर आमचे सरकार गंभीर आहे. या प्रकरणात राज्य सरकार ज्येष्ठ विधिज्ञ हरीष साळवे यांची मदत घेणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. संजय राऊत यांनी सामनामधून केलेल्या टीकेवर बोलताना फडणवीस यांनी सामना हा आता पेपर राहिला नसून तो मी वाचत नसल्याचे स्पष्टच सांगितले.

Shankhnaad News | Ep: 69 वेजिटेबल थाई ग्रीन करी आणि काजुन चिकन

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा