दारुच्या नशेत खाली पडून दिशा सालियनचा ‘अपघाती मृत्यू’, सीबीआयचा निष्कर्ष

0

मुंबई : मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन (Talent Manager Disha Salian Death Mistry) हिचा मृत्यू नेमका कसा व कुठल्या परिस्थितीत झाला, यावर बरेच आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. मात्र, आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने या प्रकरणी महत्वाचा खुलासा केला आहे. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रिजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून खाली पडून 28 वर्षीय दिशा सालियन मृत्यूमुखी पडली होती. तिचा मृत्यू अपघाती होता, असा महत्वाचा निष्कर्ष सीबीआयने या प्रकरणाच्या तपासातून काढला असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. दारूच्या नशेत तोल जाऊन दिशाचा मृत्यू झाला, अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली आहे. सीबीआयने बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासंदर्भात या प्रकरणाची चौकशी केली होती. त्यामुळे या प्रकरणाचा स्वतंत्र अहवाल तयार करण्यात आलेला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दिशा सालियन व सुशांतसिंह राजपूत या दोन्ही मृत्यूंचा संबंध एकमेकांशी जोडला जात होता.

त्यावरून काही राजकीय आरोपही झाले होते. सीबीआयच्या तपासात या प्रकरणाची माहिती पुढे आली आहे. दिशाने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या घरी गेट-टूगेदरचे आयोजित केले होते. त्याच रात्री मद्य प्राशन केलेल्या दिशाचा तोल गेला आणि ती 14व्या मजल्यावरील फ्लॅटच्या पॅरापेटवरून खाली पडली, असे सीबीआयच्या तपासात आढळून आले. या प्रकरणात सीबीआयने पार्टीला उपस्थित लोकांचे जबाब नोंदविले आहेत. याशिवाय फॉरेन्सीक अहवाल व घटनास्थळाच्या पाहणी अहवालाच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या युवा सेनेचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप झाले होत

चीज कॉर्न पत्तागोभी पुलाव & पाईनॲपल चिरोटे|Cheese Corn Cabbage Pulao Recipe |Epi.38| Shankhnaad News