आमदार सुनील केदार यांना 1 वर्षाची शिक्षा,मिळाला जामीन

0

– अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण,2016 ची घटना

नागपूर :महापारेषणच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,माजी मंत्री, आमदार सुनील केदार यांना जिल्हा सत्र न्यायालयाने 1वर्षाची शिक्षा सुनावली. केदार यांच्यासह इतर तीन जणांना शिक्षा सुनावण्यात आली. केदार यांनी वकिलामार्फत केलेल्या अर्जावर न्यायालयाने लगेच जामीन मंजूर केला आहे. महापारेषणच्या वतीने कोराडी-तिडंगीदरम्यान ६ ऑक्टोबर २०१६ रोजी अति उच्चदाब वीजवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्यानंतर वीजवाहिनीसाठी येथे मोठमोठे मनोरे उभारण्यात आले होते.


महापारेषणचे सहाय्यक अभियंता अमोल खुबाळकर हे ६ ऑक्टोबर २०१६ रोजी दोन-तीन अधिकाऱ्यांसह तेलगाव येथे शेतकऱ्यांशी त्यांच्या पिक नुकसान भरपाईसंबंधी वाटाघाटीसाठी गेले. यावेळी कंत्राटदार मेसर्स बजाज कंपनीचा एक अधिकारीही सोबत होता. अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांशी चर्चा सुरू असतानाच आमदार सुनील केदार त्यांच्या सुमारे २० सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. महापारेषणला येथे काम सुरू करण्याची परवानगी दिली कुणी, हा प्रश्न विचारून त्यांच्यासह इतर चौघांनी थुबाळकर व कंत्राटदाराच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करून अचानक मारहाण सुरू केली. पुन्हा या भागात काम करताना दिसल्यास तुमचे तुकडे करून घरी पाठवू, अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप याप्रकरणी सुनील केदार यांच्यावर होता.

पावभाजी आणि कडबोळी | Kadboli -secret reciepe, Pavbhaji Recipe |Shankhnaad Khaddya Yatra Ep.no. 71

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा