Tomato market price Today in Nagpur टोमॅटोचे गाठली शंभरी, सर्वसामान्यांना महागाईचे चटके

0

 

नागपूर –Nagpur  दररोजच्या जेवणात वापरला जाणाऱ्या tomato टोमॅटोने प्रति किलो शंभरी गाठल्याने सर्वसामान्य नागरिकांना टोमॅटोची चव चाखणे कठिण झाले आहे. टोमॅटो 100 ते 120 रु किलो ने विकला जात असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा चटका बसत आहे. kalamna krushi utpanna bajar samiti कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन दिवस सतत सुरू असलेल्या पावसामुळे बाजारात टोमॅटो गाड्यांची आवकही कमी झाली आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. कांदा, बटाटे देखील 30 रुपये झाले आहेत. सर्वसामान्य नागरिक टोमॅटो खरेदी करण्याकडे पाठ फिरवत आहेत. मालाची आवक कमी आणि लग्नसराई जोरात असताना टोमॅटोचे भाव अजून वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे100 bales of tomatoes, inflation hits the common man