दरोड्यातील 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

0

 

यवतमाळ – आर्णी येथील एका सराफा व्यावसायिकाला चाकूच्या धाकावर लूटमार प्रकरणातील सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रक्कम, सोन्याच्या दागिन्यांसह एकूण 11 लाख दहा हजार 559 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. नीलेश इसाजी ठाकरे (वय 29, रा. माळेगाव, ता. आर्णी) किरण उर्फ गांधी गोपाल कोरचे (वय 19, रा. संकटमोचन रोड), अतुल शंकर कुंभेकर (वय 29, रा. बोधड) यांना सुरुवातीला अटक करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने पवन उर्फ काल्या संतोष काकडे (वय 24, रा. आदिवासी सोसायटी), दर्शन उर्फ भिंगोटी राजू ढोरे (वय 19, रा. रेणुका मंगल कार्यालय), पद्मा उर्फ बाली विजय नागभीडकर (वय 40, रा. जामनकरनगर) यांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यात सहा आरोपी असल्याने दरोड्याच्या कलमात वाढ करण्यात आली आहे.