१११ वर्षापुर्वीचे ब्रिटीश कालीन घड्याळाचे काटे अजुनही सुरु

0

 

(Nagpur)नागपूर : आत्तापर्यंत तुम्ही ब्रिटीश काळातील जेलर चित्रपटात पाहिले असतील. आज आम्ही तुम्हाला ब्रिटीश काळातील घड्याळ दाखवणार आहोत. नागपूर पोलीस मुख्यालयातील क्वार्टर गार्डमध्ये गेली 111 वर्षे अखंड चालणारे हे घड्याळ आहे. हे घड्याळ इंग्रजांनी येथे लावले होते. हे क्वार्टर गार्ड 1912 मध्ये बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. तेव्हा तिथे इंग्रजांच्या पोलिस दलाची तुकडी असायची. ही तुकडी आपली सर्व कामे वेळेवर करू शकेल यासाठी ही घड्याळ लावण्यात आली होती.देशाच्या स्वातंत्र्यानंतर हे क्वार्टर गार्ड पोलीस विभागाला देण्यात आले.आजही नागपूर पोलीस मुख्यालयचे कर्मचारी या घड्याळीच्या काट्यावर आपली ड्युटी बजावत आहेत.हे घड्याळ क्वार्टर गार्डच्या बिल्डिंगच्यावर बाजूला बसविण्यात आले असून घड्याळ यंत्र खाली लावण्यात आले आहे, घड्याळ आणि मशीनमध्ये किमान 30 ते 40 फूट अंतर आहे. या घड्याळावर कंपनीचे नाव PROST Freres Mores 1912 लिहिले आहे. ब्रिटीश काळातील हे घड्याळ आजही कार्यरत आहे.या घड्याळाच्या देखभालीबद्दल बोलायचे झाले तर हे घड्याळ शून्य देखभालीवर चालते.या घड्याळात आठवड्यातून दोनदा चावी भरावी लागते.त्यात लाल रंगाचे दोन पेंडुलम आहे. जी किल्ली भरल्यावर वर सरकते आणि हळू हळू खाली येते जिथून चाबी भरायची गरज आहे असे समजते.नागपूर पोलीस मुख्यालयाच्या या घड्याळाला खूप लोकांची भावना जडलेली आहेत कारण असे अनेक पोलीस मुले आहेत ज्यांनी हे घड्याळ त्यांच्या लहानपणापासून पाहिली ते त्यांच्या निवृत्तीपर्यंत पाहिले आहे.(Rajesh Nagulkar)राजेश नागुलकर यांची ही तिसरी पिढी आहे जी पोलिसात आहे आणि त्यांनी ह्या घड्याळ खूप लहान असतांनी पासून पाहिली आहे.आज राजेश निवृत्तीच्या अगदी जवळ आले आहे. या मुख्यालयातही त्याने कर्तव्य बजावले, हे घड्याळ त्याच्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी सांगितले.

हे घड्याळ 111 वर्षे जुनी आहे, ब्रिटीश काळात बनविली आहे. पुरातत्व विभागाच्या यादीत या घड्याळाचा समावेश झाल्याचे पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांचे मत आहे. दुसरीकडे या घड्याळाची कोणतीही माहिती पुरातत्व विभागाकडे नाही ही एक मोठी शोकांतिका आहे.