समृध्दी महामार्गाच्या कामावर भीषण अपघातात १६ मजुरांचा मृत्यू

0

 

 

ठाणे: ठाणे येथील समृद्धी महामार्गावर शहापूरजवळ सरलांबे येथे सोमवारी रात्री पुलाचे बांधकाम सुरू असताना गर्डर लॉन्चिंग मशिन पडल्याने झालेल्या भीषण अपघातात 16 मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेत तिघे जण जखमी झाले आहेत. महामार्गावर रात्री बांधकाम सुरू होते. गर्डर मशीन 100 फूट उंचीवरून पडले. आताही अनेक मजूर दबलेले असण्याची भीती व्यक्त होत असून बचावकार्य सुरू आहे. गर्डर मशीनचे वजन जास्त असल्याने ते लवकर हटवण्यात अडचणीत येत आहेत. क्रेन मागवून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. शाहपूर उपजिल्हा रुग्णालयात सुमारे 15 मृतदेह आणण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तीन ते चार जखमींवर उपचार सुरू आहेत. अंधारामुळे अजून किती लोक मशीनच्या गर्डरखाली गाडले गेले हे सांगता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.