परभणीत 5 कामगारांचा गुदमरून मृत्यू, एक गंभीर

0

परभणी, 12 मे : परभणी जिल्ह्यातील सोनेपेठ तालुक्यामधील तांडा शिवारात सेफ्टी टॅंक स्वच्छ करताना 5 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. याठिकाणी गुरुवारी रात्री हे कामगार सेफ्टी टॅंक स्वछ करण्यासाठी आत उतरले होते. यावेळी 5 जणांचा मृत्यू झाला असून एक जण अत्यवस्थ आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार मारुती राठोड यांच्या शिवारात असलेल्या सेफ्टी टँकची गुरुवारी संध्याकाळपासून स्वच्छता सुरू होती. सेफ्टी टँकची स्वच्छता करताना विषारी वायूमुळे टँक स्वच्छ करणाऱ्या कामगारांची जीव गुदमरला. या घटनेत शेख सादेक (वय 55), शेख जुनेद (वय 32) शेख शारोक (वय 28), शेख नवीद (वय 28), शेख फेरोज (वय 29) यांचा मृत्यू झाला तर शेख साबेर (वय 18) हा अत्यवस्थ असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय.