इस्लामाबाद-दक्षिण-पश्चिम पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात शुक्रवारी मोठा आत्मघातकी स्फोट होऊन त्यात ५२ लोक ठार झाले असून ५० हून अधिक लोक जखमी असल्याची माहिती आहे. मृतांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. मस्तुंग जिल्ह्यातील एका मशिदीजवळ हा स्फोट झाला आहे. या ठिकाणी ईदनिमित्ताने मिरवणूक काढण्यात येत असताना हा स्फोट झाला. मस्तुंगचे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) नवाज गश्कोरी यांचाही या स्फोटात मृत्यू झाला आहे. संशयित आत्मघाती हल्लेखोराने ऑन-ड्युटी पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीजवळ बॉम्बस्फोट घडवून आणला.
अद्याप या स्फोटाची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. घटनास्थळावर मृतदेहांचा खच आढळून आल्याचे प्रत्यक्षदर्शनींनी सांगितले. सोशल मिडियावर त्याची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















