Home Top News शिर्डी साईबाबा मंदिर कलशारोहणाला 71 वर्ष पूर्ण

शिर्डी साईबाबा मंदिर कलशारोहणाला 71 वर्ष पूर्ण

0

 

अहमदनगर : जगप्रसिद्ध शिर्डी येथील साईबाबा मंदिर कलशारोहणाला आज 71 वर्ष पूर्ण झाले आहेत. डॉ पारनेरकरांच्या पादुका पूजन व सुवर्ण कलशाच्या प्रतिमेच्या पूजन करून 71 व वर्धापन दिन शिर्डीत मोठ्या भक्ती भावात साजरा करण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्यातील पुर्णवादाचार्य डॉ रामचंद्र महाराज जे प्रापंचिक व्यक्ती होते. त्यांच्या हस्ते 29 सप्टेंबर 1952 साली साईमंदीरावर सुवर्ण कलशारोहण पार पडले होते. लगेल्या तीन वर्षापासुन 29 सप्टेंबरला शिर्डीत सुवर्ण कलशारोहण दिन साजरा करण्यात येतो.
साईमंदीराच्या चार नंबर प्रवेशद्वार जवळ साईमंदीराच्या कलशाची प्रतीक्रुती आणि साईमूर्ती तसेच पारनेरकर महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. सुनील जोशी व शिर्डीतील संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके , शिर्डी ग्रामस्त कमलाकर कोते, रविंद्र गोंदकर , सुनील जोशी आदी उपस्थितहोते.