
वर्धा येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीमध्ये 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर, मावळते संमेलनाध्याक्ष ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे, ज्येष्ठ हिंदी कवी व समीक्षक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास यांच्यासह इतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
संमेलनाची वैशिष्ट्ये
आचार्य विनोबा भावे मुख्य सभामंडप
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथप्रदर्शन
ग. त्र्यं. माडखोलकर प्रकाशन मंच
मनोहर म्हैसाळकर सभामंडप
प्रा. देविदास सोटे कविकट्टा
कविवर्य सुरेश भट गझल कट्टा
वा. रा. मोडक बालसाहित्य मंच
मावशी केळकर वाचनमंच
दरम्यान, एकूण तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात रसिकांना वैचारीक मेजवाणी मिळणार आहे.समाजमाध्यमांतील अभिव्यक्ती, बोलीभाषा आणि समाज ते साहित्य अशा विविध विषयांवर मंथन होईल. रसिकांच्या स्वागतासाठी सुमारे 23 एकर परिसरात साहित्यनगरी सजली आहे. प्रवेशद्वारावर असलेली महात्मा गांधी यांची सूत काततानाची प्रतिकृती लक्ष वेधून घेते. शिवाय, ‘सार्थ तुकाराम गाथा’, ‘सत्याचे प्रयोग’, ‘सार्थ श्रीज्ञानेश्वरी’, ‘विनोबा भावे’ या पुस्तकांची मुखपृष्ठेही लक्ष वेधून आहेत.
वर उपस्थिती होती.