पीक विम्याच्या मुद्द्यावर जिल्हा कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन

0

 

बुलढाणा : जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना अजूनही पिक विमा मिळाला नाही त्यामुळे अनेक शेतकरी पिक विम्याची वाट पाहत आहेत. पेरणी करायची असल्याने पेरणीच्या तोंडावर तरी विमा मिळेल का? या आशेने शेतकरी विम्याच्या रकमेकडे टक लावून बसला आहे. मात्र अजूनही विमा मिळाला नसल्याने आज लोकविकास संघटनेच्या मार्फत आक्रमक पवित्रा घेत अमरावतीच्या जिल्हा कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. येत्या 15 दिवसात संपूर्ण शेतकऱ्यांना विमा दिला जाणार असल्याचे आश्वासन जिल्हा कृषी अधिकारी यांनी दिल्याने लोकविकास संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन मागे घेतले असून 15 दिवसात संपूर्ण शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही तर जिल्हा कृषी कार्यालयात तीव्र आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन करु असा पवित्रा घेतला आहे.