नागपूर : महाराष्ट्र टेलिकम्युनिकेशन्सद्वारा संचालित शंखनाद न्यूज चॅनेल आणि पोर्टलद्वारे आयोजित विदर्भाचा नंबर वन शेफ विदर्भस्तरीय पाककला स्पर्धेच्या बक्षिस वितरणाच्या निमित्ताने नागपुरात आलेल्या अभिनेत्री प्रिया मराठे यांचे उत्स्फूर्त स्वागत पहायला मिळाले. नागपुरात आगमन झाल्यानंतर विमानतळावर चाहत्यांनी त्यांचे स्वागत केले. रविवारी दुपारी अभिनेत्री प्रिया मराठे यांनी राजनगरस्थित शंखनाद कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. प्रारंभी शंखनादचे संपादक सुनील कुहीकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. अभिनेत्री प्रिया मराठे यांनी या स्पर्धेविषयी, शंखनादच्या समाजोपयोगी उपक्रमांविषयी प्रसंसोदगार काढले.याप्रसंगी त्यांनी संपादकीय सहकारी, कर्मचाऱ्यांशी मनमोकळी चर्चा केली ( Actress Priya Marathe, who came to Nagpur for the prize distribution of Vidarbha’s Number One Chef Vidarbha level cooking competition organized by Shanknad News Channel and Portal run by Maharashtra Telecommunications, got a warm welcome. After his arrival in Nagpur, he was greeted by fans at the airport. On Sunday afternoon, actress Priya Marathe paid a goodwill visit to Shanknad office in Rajnagar. Sunil Kuhikar, editor of Shankhanad, welcomed him with a bouquet of flowers. Actress Priya Marathe raved about the competition and the social welfare activities of Shanknaad. )