नागपूर :छत्रपती संभाजी राजे यांना,, स्वराज्य रक्षक म्हणणे ठीक आहे.. मात्र ते धर्मवीर नाहीत असं म्हणणं, आणि अजूनही मुजोरी सुरूच आहे. अजित पवारांचे कार्यकर्ते त्यांच्या दबावांमध्ये मुजोरी मान्य करत आहेत. आज पुण्यात झालेले स्वागत
उत्स्फूर्तपणे होत नाही असा दावा करतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुन्हा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर घसरले. मात्र अशा पराक्रमाला लोक निवडणुकीत योग्य जागा दाखवतील असा दावा केला.’
छगन भुजबळ बोलले शरद पवार जाणता राजा आहेत.. शरद पवार यांच्या कामाबद्दल आमचा आक्षेप नाही.. मात्र या जगामध्ये फक्त एकच जाणता राजा आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.. असे बोलून छगन भुजबळ यांचा डोळा अजित पवारांच्या विरोधी पक्ष नेते पदावर आहे… म्हणून ते शरद पवाराकडे आपले गुण वाढवण्यासाठी, त्यांच्या नजरेत नंबर वन राहण्यासाठी सहानुभूती मिळवण्यासाठी शरद पवार यांना जाणता राजा म्हणत असावेत असा चिमटा काढला. अजित पवार यांचेविरोधात झालेले आंदोलन उत्स्फूर्तपणे झाले. तुम्ही छत्रपती संभाजी राजे यांना काहीही म्हणणार मग भाजप कशी चूप बसणार असा सवाल करतानाच
महाराष्ट्रात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जे काही होत आहे ते योग्यच आहे जितेंद्र आव्हाड नौटंकीबाज, स्टंटबाज आहे, आपल्या मतदारसंघात राजकारण जिवंत ठेवण्यासाठी असे वक्तव्य करत राहतात.. त्यासाठी ते मह इतिहासालाही बदलून टाकतात. हिंदुत्वाचा विचार मांडणारा वर्ग कधीच जितेंद्र आव्हाड यांचे समर्थन करू शकत नाही असे स्पष्ट केले.