मुंबई Mumbai : अजित पवार Ajit Pawar यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये दाखल झालेला राष्ट्रवादीच्या NCP बंडखोर गटातील मंत्र्यांना लवकरच खातेवाटप होणार असून अर्थमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवारांकडे येणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे शिंदे Shinde गोटात नाराजी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्येही अजित पवार हे अर्थ व नियोजन मंत्री होते. अजित पवार यांच्याकडून निधी वाटप करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांना झुकत माप दिले जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरीनंतर केला होता, हे विशेष.
अजित पवार यांच्याकडेही उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांच्याकडे वजनदार खाते द्यावे लागणार आहे. गृह विभाग हा फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याने अर्थ विभाग हा अजित पवारांकडे जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.