मुंबई : राज्यातील उद्योगांवर आधारित बहुप्रतिक्षित श्वेतपत्रिका याच अधिवेशनात आणली जाणार आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर अनेक मोठे औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्याचा आरोप विरोधकांकडून झाला होता. त्यावर श्वेतपत्रिका जारी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. उद्योग मंत्री उदय सामंत हे श्वेतपत्रिका सादर करणार आहेत. वेदांता, टाटा एअरबस सी २९५, सॅफ्रन व बल्क ड्रग पार्क हे मोठे उद्योग राज्याबाहेर कसे गेले, याबाबतची श्वेतपत्रिका सादर करण्यात येणार
विद्यमान सरकारमुळे वेदांता, टाटा एअरबस सी २९५, सॅफ्रन व बल्क ड्रग पार्क हे मोठे उद्योग राज्याबाहेर गेले, असा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. विधान परिषदेत उपस्थित प्रश्नाला उद्योग खात्याचे लेखी उत्तर आले आहे. प्रश्न सभागृहात येताच मंत्री उदय सामंत वेदांता, टाटा एअरबस सी २९५, सॅफ्रन व बल्क ड्रग पार्क हे मोठे उद्योग राज्याबाहेर कसे गेले, याची श्वेतपत्रिका सादर करणार असल्याचे सांगितले.