आषाढी सोहळा : पंढरपुरात वारकऱ्यांची गर्दी वाढू लागली

0

सोलापूर 27 जून : आषाढी एकादशीचा सोहळा काही तासांवर आला असतानाच मानाच्या दोन्ही संतांच्या पालख्या पंढरपूरजवळ आल्या आहेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरीत पंढरीत दाखल होऊ लागले आहेत.दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी भंडीशेगाववरून निघाल्यावर बाजीरावची विहिर येथे चौथे गोल रिंगण आणि दुसरे उभे रिंगण पार पडेल. माउलींच्या पालखीचा पंढरपूरपूर्वी शेवटचा मुक्काम आज वाखरी येथे असणार आहे.याशिवाय संत तुकाराम महाराज यांची पालखी आज पिराची कुरोली येथून निघाल्यावर दुपारी बाजीराव विहिर येथे दुसरे उभे रिंगण पार पडेल. त्यानंतर पालखी वाखरी मुक्कामी असेल. तुकोबारायांचाही हा पंढरपूर येण्याआधी शेवटचा मुक्काम असणार आहे.