AJIT PAWAR पवारांना धमकी देणारा भाजप कार्यकर्ता-अजित पवार

0

 

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ज्या ट्विटर आकाउंटवरून धमकी देण्यात त्या ट्विटर युजरचे नाव सौरभ पिंपळकर असे असून त्याने त्याच्या बायोमध्ये “मी भाजपचा कार्यकर्ता आहे. मला धर्मनिरपेक्षतेचा तिरस्कार आहे” असे लिहिलेले आहे. त्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. धमकी देणाऱ्याला अटक झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) यांनी केली आहे.

 

धमकी देणारा हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा दावाही त्यांनी केलाय. या मुद्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, धमकी देणाऱ्याला तात्काळ अटक झाली पाहिजे. विचारांची लढाई विचारांनी लढावी, असा सल्ला देखील अजित पवार यांनी दिला.
यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, हा प्रकार उघडकीस आल्यावर आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला होता. मात्र, ते उपलब्ध नसल्याची माहिती मला त्यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली . तर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन लागला नाही, असे पवारांनी सांगितले. पोलिस अधिकाऱ्यांशी बोलण्यापेक्षा मी या दोघांशी बोलणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. सर्वच पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांना सांभाळावे, असे आवाहन पवार यांनी केले.