दहशतवादी हल्ल्यात ताजमध्ये अडकले होते उद्योगपती गौतम अदानी!

0

मुंबईः उद्योगपती गौतम अदानी यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. आपण दोनदा जवळून मृत्यू पाहिल्याचे त्यांनी एका प्रकट मुलाखतीत (Gautam Adani on Life Threat) सांगितले आहे. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्या दरम्यान आपण ताज हॉटेलमध्ये अडकले होतो, असे त्यांनी सांगितले. अदानी यांनी सांगितले की, दुबईच्या एका मित्रासह त्यावेळी ताजमध्ये जेवायला गेलो होतो. त्यावेळी जेवण झाल्यावर बिल देत असतानाच दहशतवाद्यांचा गोळीबार सुरु झाला. अगदी जवळून मृत्यूला पाहिले होते. मात्र, त्यात आम्ही सुखरूप बचावले. त्यावेळी आम्ही घाबरले नाही कारण त्याचा काहीच उपयोग होणार नव्हता, असे अदानी यांनी मुलाखतीत सांगितले. १९९७ मध्ये अदानी यांचे अपहरण करण्यात आले होते. आपल्या अपहरणाबद्दल बोलताना गौतम अदानी म्हणाले की, खरे तर वाईट काळ विसरायलाच हवा. पण, अपहरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपली सुटका करण्यात आली होती. पण ज्या रात्री आपले अपहरण झाले, त्या रात्री मी अतिशय शांतपणे झोपलो होतो. कारण हातात नसलेल्या गोष्टींची जास्त काळजी केल्याने काहीच फायदा होत नाही. त्यावेळी मी तेच केले, असे अदानी म्हणाले. जगातील तिसऱ्या व आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले गौतम अदानी कठोर परिश्रम हेच आपल्या व्यवसाय आणि जीवनातील यशाचे सूत्र असल्याचे सांगतात. जे आपल्या हातात नाही, त्याची चिंता कोणीच करू नये. नियती स्वतःच ठरवते, असेही ते सांगतात.

Shankhnaad News | Ep: 69 वेजिटेबल थाई ग्रीन करी आणि काजुन चिकन