विदर्भ साहित्य संघाच्या वाङ् मय पुरस्कारांसाठी आवाहन

0

 

मराठी साहित्यात महत्त्वपूर्ण कामगिरी असलेल्या वैदर्भीय लेखकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी विदर्भ साहित्य संघाचे वाङ् मय पुरस्कार वैदर्भीय लेखकांना प्रदान केले जातात. (Novel)कादंबरी (पु.य.देशपांडे स्मृती), वैचारिक वाङ्मय (म. म. वा.वि.मिराशी स्मृती), (Autobiography)आत्मचरित्र (अण्णासाहेब खापर्डे स्मृती), (Review)समीक्षा(कुसुमानिल स्मृती), (Poetry)कविता (शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृती), (Classical writing)शास्त्रीय लेखन ( य.खु.देशपांडे स्मृती ), (travelogue)प्रवासवर्णन (संत गाडगेबाबा स्मृती), (Character)चरित्र (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृती), कथा (वा.कृ.चोरघडे स्मृती), (Literary or Sacred Literature)साहित्यशास्त्र किंवा संतसाहित्यविषयक (डॉ.मा.गो. देशमुख स्मृती), (Playwriting)नाट्यलेखन (नाना जोग स्मृती), (children’s literature)बालसाहित्य (बा.रा.मोडक स्मृती), संकीर्ण (वा. ना. देशपांडे) इत्यादी वाङ् मयप्रकारातील हे पुरस्कार असून पुरस्कारांसाठी आलेल्या पुस्तकांतील उल्लेखनीय पुस्तकांना हे पुरस्कार दिले जातात. त्याशिवाय दोन नवोदित लेखकांना सुध्दा त्यांच्या पहिल्या पुस्तकांसाठी पुरस्कृत केले जाते. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने (P.B.Bhave Award)पु.भा.भावे पुरस्कार, (Dr. Sridhar Shanvare Award)डॉ.श्रीधर शनवारे पुरस्कार आणि (Dr. Asha Savdekar Award)डॉ. आशा सावदेकर पुरस्कार असे तीन पुरस्कार सुरू केले आहेत. महाराष्ट्र पातळीवरील लेखकांच्या कृतींना या पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात येत असते. या पुरस्कारांसाठी वाङ् मयप्रकाराचे बंधन नाही.उपलब्ध पुस्तकांतून हे पुरस्कार दिले जातील.या पुरस्कारांसाठी विदर्भासह महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रातील लेखकांच्या पुस्तकांचा विचार करण्यात येईल.

१ ऑगस्ट २०२२ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा या पुरस्कारांसाठी विचार करण्यात येईल. या पुरस्कारांसाठी पुस्तके पाठवताना लेखकांनी किंवा प्रकाशकांनी आपल्या पुस्तकांच्या दोन प्रतींसह पासपोर्ट आकाराचे दोन छायाचित्रे व लेखक / कवींचा परिचय पाठविणे आवश्यक आहे. पुरस्कारांसाठी लेखकांनी किंवा प्रकाशकांनी आपली पुस्तके दि. १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत सरचिटणीस, (Vidarbha Sahitya Sangh)विदर्भ साहित्य संघ, (Jhansi Rani Chowk, Sitabardi, Nagpur)झाशी राणी चौक, सीताबर्डी, नागपूर -४४००१२ या पत्त्यावर पाठवावीत. किंवा कार्यालयीन वेळात प्रत्यक्ष कार्यालयात आणून द्यावीत.
रोख ५००० (पाच हजार रुपये) आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिन समारंभात दि.१४ जानेवारी २०२३ रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील, असे (Vidarbha Sahitya Sangh General Secretary Vilas Manekar) विदर्भ साहित्‍य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर यांनी कळवले आहे.