मुंबई- mumbai “देवेंद्र फडणवीस chandrashekhar bawankule यांच्यासोबत शिंदें यांची तुलना होता कामा नये. देवेंद्रजी हे पाच वर्षे मुख्यमंत्री होते व भाजपचे सर्वोत्कृष्ट नेते म्हणून त्यांची अष्टपैलू कामगिरी आहे.. ज्यांनी कोणी जाहिरात केली आहे, त्याने देवेंद्रजींची शिंदेंसोबत तुलना करणे हे अचंबित करणारे होते’” या शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाला अप्रत्यक्ष इशारा दिला.
“काही प्रतिक्रिया येत असतात जेव्हा एखादी गोष्ट ही मनाविरुद्ध होते. कालच्या जाहिरातीने काही कार्यकर्त्यांची मने दुखावली गेली. कारण देवेंद्रजी हे पाच वर्ष मुख्यमंत्री होते आणि भाजपचे सर्वोत्कृष्ट नेते म्हणून त्यांची अष्टपैलू कामगिरी आहे. या आधारावर त्यांनी या महाराष्ट्रात लाखो कार्यकर्ते घडवले आहेत. पक्ष वाढवला आहे. सरकार म्हणून काम केले आहे. त्यामुळे थोडी ठेच मनाला लागली आहे..” या शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.
बावनकुळे म्हणाले, “शिंदेजी उत्कृष्ट आहेत. पण, त्यांची व देवेंद्र फडणवीस यांची तुलना योग्य नाही. हे कोणीतरी खोडासाळपणे केलेले असू शकते. कारण एकनाथजी एवढ्या कोत्या मनाचे नाहीत. ते मोठ्या मनाचा, विचारांचे व्यक्ती आहेत. ते कधीही अशा लहान विचारात वागत नाहीत. पण, ज्यांनी कोणी जाहिरात केली आहे, त्याने देवेंद्रजींची शिंदेंसोबत तुलना करणे हे अचंबित करणारे होते’ असे बावनकुळे म्हणाले.
‘मला वाटतं की, काही कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया स्वाभाविक असतील. आता हा विषय संपला आहे’ असेही ते म्हणाले.
अशा पद्धतीची जाहिरात करून महायुतीला वाद निर्माण करण्याचा ज्या कोणी प्रयत्न केला आहे, त्यात आता मला जायचं नाही. पण असे विषय यापुढे होऊ नये, असे मला वाटते. त्यासाठी मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजींशी बोलणार आहे. यानंतर मात्र, कोणाचेही मन दुखावले जाणार नाही’ असे बावनकुळे म्हणाले.