Chief Minister Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन, विमानतळावर स्वागत

0

नागपूर : विदर्भातील महत्वाकांक्षी गोसीखुर्द जलपर्यटन व राष्ट्रीय प्रकल्पाची पाहणी करण्याकरीता व भंडारा जिल्ह्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण व भूमीपूजन कार्यक्रमासाठी Chief Minister Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज शनिवारी नागपूर विमानतळावर ११.३० वाजता आगमन झाले. लगेच ते हेलिकॉप्टरने भंडारा कडे रवाना झाले. पूर्व विदर्भात प्रथमच त्यांची जाहीर सभा होणार आहे. शनिवारी सकाळी त्यांचे विशेष विमानाने नागपूर येथे आगमन झाले. त्यांच्यासोबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत होते. MP Kripal Tumane, Divisional Commissioner Vijayalakshmi Prasanna Bidri, Police Commissioner Amitesh Kumar, Collector Dr. Vipin Itankar, Chairman of Nagpur Reform Pranyas Manoj Kumar Suryavanshi, District Superintendent of Police Vishal Anand विमानतळावर खासदार कृपाल तुमाणे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी,जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद आदींनी त्यांचे स्वागत केले. कार्यकर्त्यांना अभिवादन केल्यानंतर ते हेलिकॉप्टरने रवाना झाले. भंडारा येथे भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील गोसीखुर्द जलपर्यटन तथा प्रकल्पाची पाहणी आणि यानंतर विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण त्यांच्याहस्ते होणार आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा