भंडारा- देशात विविध ठिकाणी आदिवासी, ओबीसी, दलित व मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचर होत आहे. मात्र, ज्या समाजाच्या व्यक्तीवर अत्याचार होतो, तोच समाज रस्त्यांवर उतरून निषेध नोंदवत आंदोलने करतो. त्यामुळे त्याला न्याय मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, याकडे एक समाज नाही तर एक माणूस म्हणून बघितले जावे व पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व समाजाच्या घटकाने एकत्रित लढा देण्याची गरज आहे. दिल्ली येथील नवीन संसद भवन उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित न करणे हा आदिवासी समाजाचा मोठा अपमान आहे. यासह देशातील विविध राज्यात दलित, ओबीसी व मुस्लिम समाजाच्या व्यक्तीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात येत्या 2 ऑगस्ट रोजी भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून त्यामध्ये सर्व समाजाने सहभागी व्हावे अशी मागणी आज भंडारा येथे संविधान बचाव संघर्ष समितीचे वतीने आयोजित पत्रकार परिषदेत सरफराज शेख, मुस्लिम समाजाचे नेते, संविधान बचाव संघर्ष समिती यांच्यामार्फत करण्यात आली.