
नागपूर: ग्राहक हक्क संरक्षण आणि संवर्धनासाठी दीर्घ काळ कार्यरत असलेल्या ॲड. गौरी दिलीप चांद्रायण (वय ६६) यांचे निधन झाले. महावितरणच्या सल्लागार (ग्राहक विषयक) म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासोबतच, ग्राहक चळवळीतील एक अभ्यासू आणि आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती.
ॲड. गौरी चांद्रायण यांनी नागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात त्यांनी न्यायिक सदस्य म्हणून प्रभावी काम केले. शहरी विभागाच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या (CGRF) व रेल्वे डीआरयूसीसीत त्या सक्रिय सदस्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती दिलीप चांद्रायण, मुले डॉ. कपिल व अंबरीश चांद्रायण, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
















