
ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीड येथे कार्यक्रम
नागभीड : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रांत यांच्या वतीने महान आदिवासी जननायक व स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी तीर्थक्षेत्र कचारगढ येथुन ‘जनजाति गौरव कलश यात्रा’ काढण्यात आली. या यात्रेचे नागभीड येथे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी जि.प. माजी सदस्य संजय गजपुरे , नागभीड नगरपरिषदेचे नगरसेवक गणेश तर्वेकर , अभाविप चे माजी प्रांतमंत्री शक्ती केराम , विहिंप चे तालुका अध्यक्ष अभिषेक जयस्वाल , बजरंग दल चे ओमप्रकाश मेश्राम , गुलाब राऊत यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
याप्रसंगी आयोजित मुख्य कार्यक्रम समिधा सेवा संस्था द्वारा संचालित श्रीमती रामप्यारी देवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीड येथे घेण्यात आला. यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मस्थळावरून कलशामध्ये आणलेल्या पावन मातीचे विधीवत पूजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्य, आदिवासी समाजाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान व त्यांच्या विचारांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
सिंदखेडराजा , मेळघाट व कचारगढ या स्थानांवरुन निघालेल्या तीन यात्रांचा एकत्रित समारोप गडचिरोली येथे ९ जानेवारी ला सुरु होणाऱ्या अभाविप च्या विदर्भ प्रदेश अधिवेशनात होणार आहे.
नागभीड येथील झालेल्या कार्यक्रमास या यात्रेचे प्रमुख तथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पियूष बनकर (गोंदिया जिल्हा विद्यार्थी विस्तारक), अनिकेत बुरांडे (काटोल भाग विद्यार्थी विस्तारक), पवन वानखेडे (रामटेक व पारशिवणी नगर विद्यार्थी विस्तारक), तुषार शिंगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच समिधा सेवा संस्थेचे अध्यक्ष व नगरसेवक गणेश तर्वेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे, विश्व हिंदू परिषद तालुका अध्यक्ष अभिषेक जयस्वाल, गौरक्षण प्रमुख ओमप्रकाश मेश्राम उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या प्राचार्या शुभांगी पोहेकर व मुख्याध्यापिका संगीता नारनवरे यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांचा या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जनजागृती, राष्ट्रभक्ती व आदिवासी संस्कृतीविषयी आदर निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला.





















