औरंगाबाद – औरंगाबाद खंडपीठात राज्य सरकार विरोधात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे याबाबत खंडपीठाने राज्याचे मुख्य सचिव, मान्य प्रशासनाचे सचिव आणि बांधकाम विभागाच्या सचिवांना नोटीस बजावली आहे. महाविकास आघाडी सरकार असताना काही मंजूर केलेली विकास काम एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार येताच थांबवण्यात आले होते, त्याला स्थगिती देण्यात आली होती याबाबत औरंगाबाद खंडपीठात एक याचिका करण्यात आली होती. त्यावर कोर्टांने ही मंजूर झालेली कामे तातडीने सुरू करावे असे आदेश दिले होते. मात्र कोर्टाच्या आदेशानंतरही ३-४ महिने उलटून अजून पर्यंत काम सुरू झाली नाहीत, म्हणून आता याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात अवमान याचिका दाखल केली आहे. त्यानुसार हायकोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना या नोटिसा बजावलेली आहेत या प्रकरणात पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर करण्यात आली आहे.