Home Top News ‘एसीपी’ने केली पत्नी आणि पुतण्याची हत्या, स्वतःलाही संपवलं

‘एसीपी’ने केली पत्नी आणि पुतण्याची हत्या, स्वतःलाही संपवलं

0

पुणे : अमरावती पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असलेले भरत गायकवाड यांनी पुण्यात आपल्या पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केली आणि त्यानंतर गोळी झाडून स्वत:लाही संपवल्याची थरारक घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. एसीपी गायकवाड हे पुण्यात सुटीवर आले होते. शहरातील बालेवाडी परिसरातील ही घटना असून हा प्रकार नेमका कशातून घडला, याचा शोध चतु:शृंगी पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अमरावती पोलिस दलात राजापेठ विभागात गायकवाड हे सहायक पोलिस आयुक्त म्हणून नेमणुकीला होते. ते सुटीवर पुण्याला आले होते. तेथेच हा प्रकार घडला. पहाटे चार वाजताच्या सुमारास गायकवाड यांनी पत्नी मोनी गायकवाड व पुतण्या दीपक गायकवाड यांची गोळ्या झाडून त्यांची हत्या केली व त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. शेजाऱ्यांना आवाज आल्याने हा प्रकार उघडकीस आला. बालेवाडी परिसरात हा प्रकार घडला. गोळ्या झाडण्यासाठी त्यांनी परवाना असलेल्या खासगी पिस्तुलाचा वापर केल्याची पोलिसांची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.