नागपूर-गोवा महामार्ग लवकरच-फडणवीस यांची ग्वाही

0

नागपूर- लवकरच नागपूर- गोवा महामार्गाचे काम सुरू केले जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात केली.विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला तो जोडेल यासंबंधीची संकल्पना आम्ही तयार केली आहे याकडे लक्ष वेधले. यासोबतच नागपूरला आता रोड ,रेल्वे कनेक्टिव्हिटी झाली आहे स्पीड कॉरिडोर तयार झाला आहे.आता महिनाभरात नागपूर विमानतळाच्या भूमिपूजनासाठीही पंतप्रधानांनी यावे असे निमंत्रणही फडणवीस यांनी दिले. समृद्धी महामार्गाच्या शेजारी रेल्वेचा हाय स्पीड कॉरिडॉर उभारला जाणार असून जागा अधिग्रहण करण्यात आली आहे. सीएनजी गॅस पाईपलाईनचे 80 टक्के काम पूर्ण झालेले आहे. उद्योगांना थेट गॅस पुरवठा केला जाऊ शकणार आहे यासोबतच आता पेट्रोलियम पाईप लाईनची मागणी आपण केलेली आहे .केंद्र सरकारच्या नव्या धोरणामुळे गतिशक्तीचे अद्भुत उदाहरण असा हा समृद्धी महामार्ग राहणार आहे. गोंदिया, गडचिरोली पर्यंत तो जोडला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा