पावसामुळे वातावरणात गारवा

0

गोंदिया -हवामान खात्याचे अंदाजा नुसार काल रात्रीपासून गोंदिया जिल्ह्यात पावसाची रिप रिप सुरू आहे. जिल्ह्यामध्ये हळूहळू गारवा निर्मिण होऊ लागला आहे. उन्हाच्या काहिलीने आता नागरिकांची सुटका होणार असून हा पाऊस शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असल्याने या पावसा नंतर शेतीचे कामे सुरू होणार असल्याने धान उत्पादक आनंदी आहे.

पुलावर 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी

मुंबई – नवी मुंबईतील वाशी टोल नाक्याजवळील खाडी पुलावर सकाळी एका कंटेनरचा अपघात झाला. यामुळे वाशी खाडी पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी जुना खाडी पूल हलक्या वाहनांसाठी खुला केला असला तरी अद्याप वाहतूक कोंडी कमी झालेली नाही. रस्त्यात अडकलेला कंटेनर काढण्यात आला असून वाहतूक सुरळीत करण्याच काम वाहतूक विभागाकडून करण्यात येत आहे.