
नागपूर(Nagpur): स्वतंत्र भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३५ वी जयंती निमित्ताने विदर्भ साहित्य संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. डॉ गिरीश गांधी यांनी विदर्भ साहित्य संघातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बाळ कुळकर्णी, सरचिटणीस विलास मानेकर, कोषाध्यक्ष माधुरी साकुळकर तसेच शुभदा फडणवीस, संदीप बारस्कर, पराग घोंगे, अनिल इदांणे, स्वाती मोहरीर, अजय गंपावार हे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला, कर्तृत्वाला आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील मार्गदर्शनाला विदर्भ साहित्य संघातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.
















