Home Artical Blog ‘एव्हरग्रीन हिट्स’ संगीत मैफलीचे 6 मे रोजी आयोजन

‘एव्हरग्रीन हिट्स’ संगीत मैफलीचे 6 मे रोजी आयोजन

0

नागपूर(Nagpur), 4 मे
श्री सिद्धिविनायक पब्लिसिटीच्या ‘एव्हरग्रीन हिट्स’ या शानदार संगीत मैफलीचे बुधवार, 6 मे रोजी सायंकाळी 6.00 वाजता लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक हॉल येथे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती श्री सिद्धिविनायक पब्लिसिटीचे संचालक समीर पंडित यांची निवेदन अॅड. सिमरन नायडू यांचे राहणार आहे. प्रसिद्ध गायिका निकेता जोशी यांची अतिथी गायिका म्हणून विशेष उपस्थिती राहील.
स्वप्ना पांडे, आरती बुरडकर, समीक्षा चरडे, डॉ अमृता परोळकर, अनघा वैद्य यांच्यासह हर्षवर्धन वैरागरे, शशिकांत वाघमारे, आशिष पाटील, धीरज परपल्लीवार, प्रदीप जानवे, हेमंत गांडोले, सुनील माहूरकर हे गायक कलाकार विविध गीते सादर करतील. संगीत साथीसाठी परिमल जोशी, ऋग्वेद पांडे, राजू गजभिये, पंकज यादव आणि महिंद्र वाटुळकर हे वादक कलाकार राहतील. हा कार्यक्रम नि:शुल्‍क असून संगीतप्रेमींनी या मैफलीचा आनंद घ्‍यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.