गौतम अदानी पुन्हा पवारांकडे, राजकीय वर्तुळात चर्चा

0

मुंबईः हिंडेनबर्ग अहवालामुळे गौतम अदानी यांच्या अदानी उद्योग समूह चर्चेत असताना उद्योगपती गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी रात्री अदानी यांनी भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा तर्कवितर्क लढविले जात आहेत. तर दुसरीकडे यात वेगळे काहीही नसल्याचा दावा अजित पवारांनी केलाय.
पवार-अदानी भेटीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, भेट झाली म्हणजे काय झाले? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्हाला काही महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी पंतप्रधानांचीही भेट घ्यावी लागली होती. तेव्हा तेही भेटले होते, असे पवार म्हणाले.