
नागपूर (Nagpur) : महायुतीचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विधानपरिषदेचा सभापती म्हणून माझ्या नावाची शिफारस केली. परिषदेचा सभापती बिनविरोध निवडून यावा, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. विरोधकांनी त्याचा मान ठेवत माझ्या निवडीला पाठींबा दिला आहे.
याबद्दल महायुती आणि विरोधकांचे आभार मानतो. राजकारणात चर्चा महत्त्वाची आहे. मी विधानसभेची निवडणूक हरल्यानंतरही माझे नाव मंत्री, प्रदेशाध्यक्ष यासाठी चर्चेत होते. मात्र, माझ्या पक्षाला माझ्यावर विश्वास असल्यामुळे त्यांनी मला योग्य सन्मान मिळवून दिला आहे. त्यांनी दिलेल्या या संधीचे मी नक्कीच सोने करेल, अशी भावना भाजपचे आमदार विधानपरिषद सदस्य राम शिंदे यांनी बुधवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.
Related posts:
वेकोलि एवं नागपुर महानगरपालिका की संयुक्त पहल : सार्वजनिक परिवहन को बढ़ावा देने हेतु बस सेवा का शुभा...
June 10, 2026MAHARASHTRA
वीएनआईटी में हिंदी की तिमाही रिपोर्ट ऑनलाइन भरने पर कार्यशाला संपन्न
June 10, 2026LOCAL NEWS
मान्सूनपूर्व देखभालीसाठी आज काही भागांत वीज पुरवठा राहणार बंद; नागरिकांनी सहकार्याचे करण्याचे आवाहन
June 10, 2026LOCAL NEWS



















