‘ग्लोबल इंडियन स्टार्स’ ही नागपूरच्या तरुणांसाठी उत्तम संधी

0
‘ग्लोबल इंडियन स्टार्स’ ही नागपूरच्या तरुणांसाठी उत्तम संधी
global-indian-stars-is-a-great-opportunity-for-the-youth-of-nagpur

 

नागपूर (Nagpur) ७ नोव्हेंबर २०२४:-  नागपुरातील ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (जीआयआयएस) तर्फे पहिली-वहिली “ग्लोबल इंडियन स्टार्स” स्पर्धा आयोजित करण्यात येत असून नागपूरच्या तरुण प्रतिभांना त्यांची संगीत क्षमता सादर करण्याची अनोखी संधी यातून दिली जाते आहे, असे प्रसिद्ध गायक-संगीतकार शेखर रावजियानी यांनी सांगितले. झूम मीटिंगच्या माध्यमातून त्यांनी नागपुरातील पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

“ग्लोबल इंडियन स्टार्ससाठी जीआयआयएस नागपूर सोबत या स्पर्धेसाठी काम करणे ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बाब असल्याचे ,” शेखर म्हणाले. भविष्यातील प्रतीभांना प्रोत्साहन देण्यासाठी यापूर्वी देखील शेखर यांनी ग्लोबल स्कूल्स ग्रुपसोबत भागीदारी केली आहे. “नागपूरच्या तरुण-तरुणींमधील कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना संगीत क्षेत्रात पहिले पाऊल टाकण्यास मदत करण्यासाठी मी उत्सुक आहे.” असे शेखर (Shekhar Ravjiani) यांनी स्पर्धेबद्दलचा उत्साह व्यक्त करताना सांगितले. 30 नोव्हेंबर 2024 रोजी होऊ घातलेल्या ग्रँड फिनालेमध्ये आपल्या तरुण स्टार्सचे परफॉर्मन्स पाहण्यासाठी मी अत्यंत उत्सुक असल्याचे शेखर म्हणाले.

ही स्पर्धा कनिष्ठ आणि वरिष्ठ वयोगटातील सहभागींसाठी खुली असेल आणि यात दोन श्रेणींचा समावेश असेल – गायन आणि वाद्य . शनिवारी 30 नोव्हेंबर, 2024 रोजी ग्रँड फिनाले इव्हेंटमध्ये स्थान मिळवण्यासाठी सहभागींनी त्यांचा दोन मिनिटांचा परफॉर्मन्स व्हिडिओ जमा करणे आवश्यक आहे, ज्याचे मूल्यमापन जीआयआयएस कॅम्पसमधील संगीत शिक्षकांचा समावेश असलेल्या निवड समितीद्वारे केले जाईल. गुणवत्तेवर आधारित उत्‍कृष्‍ट 100 परफॉर्मन्स निवडले जातील आणि प्रतिष्ठित ज्युरी समितीद्वारे त्यांचे मूल्यांकन केले जाईल.
उत्‍कृष्‍ट 20 सहभागी स्पर्धक ग्रँड फिनालेसाठी निवडले जातील. ग्रँड फिनालेचा सोहळा जीआयएसएस लावा कॅम्पस, नागपूर येथे होणार असून शेखर रावजियानी यासाठी सन्माननीय पाहुणे असतील. सर्व श्रेणीतील विजेत्यांना एकूण 4 लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे, जीआयआयएस नागपूर येथे शिष्यवृत्ती लाभ आणि शेखर यांच्या मार्गदर्शनाची संधी मिळेल.

ग्लोबल इंडियन स्टार्स हा जीआयआयएस ची पालक संस्था असलेल्या ग्लोबल स्कूल्स ग्रुप चा एक प्रमुख कार्यक्रम आहे आणि एका दशकापूर्वी पहिल्यांदा लॉन्च केल्यापासून याला सिंगापूरमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा जगभरातील अधिक शहरांपर्यंत विस्तार होत असल्याबद्दल जीएसजीचे अध्यक्ष अतुल टेमुर्णीकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Nagpur weather
Nagpur is famous for
www.nagpur.gov.in 2024
Nagpur which state
NMC Nagpur
Index number for property tax Nagpur
NMC Nagpur property tax receipt
Nagpur in which state in Map