गुरुजींनी वाढविले गावांतील अंतर
बदलीसाठी केलेला बनाव उघड

0


यवतमाळ. मुलांना संस्कारित करण्याची जबाबदारी गुरुजींची. गवातील प्रत्येकासोबत संवाद असल्याने गवात सलोख्याचे वातावरण ठेवणे, गावांना जोडण्याचे नैतिक कर्तव्यही त्यांच्याकडेच येते. पण, याच शिक्षकांनी जोडीदार दूर नको म्हणून चक्क गावां- गावांतील अंतर वाढविले (Teachers increased the distance between villages). सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्याशी संगणमत करीत हा प्रकरा केला. अर्ज छाणनीत हा प्रकार उघड झाला आणि सर्वांनाच धक्काही बसला. शिवाय गुरुजींचे मनसुबेही उधळले गेले. त्याचे झाले असे की, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, यात प्राधान्य मिळविण्यासाठी काही गुरुजींनी वेगवेगळे घोळ केल्याची प्रकरणे समोर येत आहेत. पती-पत्नी दोघेही शिक्षक असलेल्या लाभार्थ्यांनी एकमेकांच्या जवळ जवळ बदली मिळविण्यासाठी अंतराचे बोगस प्रमाणपत्रे सादर (Submitted bogus certificates of distance to get transfer ) केल्याचे पुढे आले आहे.
ऑनलाईन पोर्टलद्वारे ही प्रक्रिया राज्यस्तरावरून राबविली जात असली तरी आक्षेप घेण्याची सुविधा जिल्हास्तरावर देण्यात आली आहे. बदलीपात्र आणि बदली अधिकार प्राप्त अशा दोन हजार शिक्षकांची यादी पोर्टलद्वारे जाहीर झाली आहे. त्यात अनेकांनी संवर्ग एक आणि संवर्ग दोनचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले आहेत. संवर्ग एकमध्ये दिव्यांग व दुर्धर आजारग्रस्त शिक्षकांचा समावेश आहे. तसेच संवर्ग दोनमध्ये पती-पत्नी एकत्रीकरणाची सुविधा मिळणार आहे.
शिक्षक असलेल्या ज्या पती-पत्नीच्या शाळांमधील अंतर ३० किलोमीटरपेक्षा अधिक आहे, त्यांना संवर्ग दोनमधून बदली प्रक्रियेत प्राधान्य मिळणार आहे. मात्र, हा लाभ घेण्यासाठी ज्यांच्या शाळेचे अंतर २५ किमी, २६ किमी आहे, त्यांनीही सार्वजनिक बांधकाम खात्यातील यंत्रणेशी ‘संवाद’ साधून ३० किमी अंतराचे प्रमाणपत्र मिळवून सादर केले आहे. अशा शिक्षकांच्या अर्जांवर इतर शिक्षकांनी आक्षेप घेतल्यानंतर ते अर्ज शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावर झालेल्या छाननीत रद्द करण्यात आले. परंतु, त्यांनी आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे.