नवी दिल्ली New Delhi: उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर ३१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाकडे देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. (UBT Petition in Supreme Court against ECI) हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी या गटाने केली आहे. एकनाथ शिंदे यांना निवडणूक चिन्ह देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय कायदेशीर चुकांनी भरलेला असून आयोगाने चिन्ह आदेशाच्या परिच्छेद 15 नुसार दिलेल्या अधिकाराचा गैरवापर केला असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आलाय.The petition filed by the Uddhav Thackeray group against the decision of the Election Commission will be heard on July 31.
याचिकेतील दाव्यानुसार, आयोगाने विधीमंडळ पक्षातील फुटीला पक्षातील फुट म्हणून स्विकारणे चुकीचे असून पक्षविरोधी कारवायांमुळे एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना सदस्यत्वासाठी अपात्र ठरवले जाऊ शकते, याकडेही निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केल्याचे याचिकेत नमूद आहे. 2018 साली शिवसेना पक्षाच्या घटनेत बदल करण्यात आल्याचा दावाही ठाकरे गटाकडून याचिकेत करण्यात आला आहे. या अंतर्गत अध्यक्षांना बरेच अधिकार देण्यात आले होते. मात्र, पक्षाच्या घटनेतील बदलाबाबत अधिकृतपणे माहिती देण्यात आली नसल्याचे सांगत निवडणूक आयोगाने ते स्वीकारण्यास नकार दिला आहे. दरम्यान, ठाकरे गटाने आमदार अपात्र प्रकरणावरूनही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या मुद्यावर अद्याप विधानसभा अध्यक्षांकडून निर्णय झाला नसल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.