सहव्याधी असणार्यांना आता एच ३ एन २ साथीचा धोका अधिक
नागपूर. सामान्य व्हायरल इंफेक्शन साधारतः तीन-चार दिवसात होते होते. मात्र, हल्ली व्हायरल इंफेक्शनमुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण इस्पितळात भरती होत असून आजारी राहण्याचा आणि इंफेक्शननंतर अशक्तपणा जाणवण्याचा कालावधी वाढल्याची नोंद रुग्णांनी केली आहे. हे इंफेक्शन प्रामुख्याने एच३एन२ या विषाणुमुळे (H3N2 virus ) होत असल्याची माहिती ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ व विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक अरबट (Vidarbha Hospital Association President Dr. Ashok Arabt ) यांनी दिली. एच३एन२ हा इंफ्लुएंजा ए व्हायरसचा उपप्रकार (subtype of influenza A virus ) असून १९६८ साली त्याची साथ आली होती. त्यामध्येही दहा लाख लोकांचा मृत्यु झाल्याची नोंद आहे. आयसीएमआरने हा ‘एच३एन२’ विषाणुमुळे विकार होत असल्याचे स्पष्ट केले आहे. कोविड सारखे ड्रॉपलेटच्या माध्यमातून पसरणारा व्हायरस असून रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर एक ते चार दिवसात याची लक्षणे दिसून येतात. कफ, ताप, गळ्याला सुज, सर्दी, अंगदुखी, थंडी वाजणे, अंग थरथरणे, अशक्तपणा आणि विशेषतः लहान मुलांमध्ये उलटी व हगवण अशी लक्षणे आहेत. सहव्याधी असणारे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि उपचारांमुळे इम्युनिटी कमी झालेले रुग्ण यांना या विकाराचा सर्वाधिक धोका असून प्रसंगी न्युमोनिया सारखी गुंतागूंत होऊ शकते, श्वसनप्रणाली बंद पडू शकते आणि जीव जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
एच ३ एन २ व्हायरसमुळे होणार्याे विकारावर ओसेल्टॅमिविर, झॅनामाविर सारखी अॅ्न्टिव्हायरल औषधे प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय पुरेसे पाणी पिणे, विश्रांती करणे आवश्यक आहे. जर श्वास घेण्यास त्रास होत असेल, छातीत दुखत असेल, डिहायड्रेशन झाले तर, भ्रमिष्टासारखं वाटतं असेल तर इस्पितळात अॅशडमिट होणे हितावह आहे. याशिवाय हृदयविकार, मधूमेह, उच्चरक्तदाब, किडनीचे विकार आणि अन्य सहव्याधी असल्यास अधिक काळजी घेणे व अस्वस्थ वाटल्यास तातडीने वैद्यकीय सहाय्यता घेणे क्रमप्राप्त आहे.
एच३एन२ सारख्या विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हात धुणे, मास्क घालणे, सहव्याधी असणार्यांतनी गर्दी टाळणे, खोकलताना रुमाल धरणे, सतत डोळे व तोंडाचा स्पर्श टाळणे अशा प्रकारची कोविड दरम्यान घेतलेली काळजी घेणे आवश्यक आहे. याशिवाय बाहेरचे खाणे टाळले पाहिजे.
जीवघेणा नसला तरी काळजी घ्या
एच३एन२ विकार कोविड सारख्या किंवा यापूर्वीच्या एच१एन१ सारखा जीवघेणा नाही. योग्य काळजी घेतली आणि औषधोपचार केले तर रुग्णांना आराम पडतो. बसं सामान्य व्हायरलपेक्षा थोडा वेळ लागत असला तरी रुग्णांना आराम पडतो. फक्त कोमॉर्बिडिटी असलेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी
डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ, क्रिम्स हॉस्पिटल, नागपूर
इंफ्लुएंजाचे लसीकरण करावे
ज्यांना एच३एन२ विकाराचा अधिक धोका आहे, त्यांनी इंफ्लुएंजाचे लसीकरण दरवर्षी करवून घेतले पाहिजे; जेणेकरून विकाराला आळा घालता येईल अथवा तीव्रता कमी करता येईल.
खालील लक्षण आणि त्यांचे प्रमाण
ताप : ९२ टक्के
कफ : ८६ टक्के
श्वास घेण्यास त्रास : २७ टक्के
शिंका :१६ टक्के
निमोनिया : १६ टक्के
कपकपी : ६ टक्के