सरस्वती नगरात घरीच केली महिलांनी वटवृक्षांची पूजा

0

 

नागपूर: सौभाग्यवती आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हिंदू पंचांगानुसार जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी उपवास, व्रत करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. परंपरेनुसार यावेळीही शहराच्या विविध भागात लावलेल्या वटवृक्षांची पूजा करतांना सौभाग्यवती जागोजागी दिसून आल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक सौभाग्यवती नटून आणि रंगीबेरंगी साड्या नेसून भर दुपारी वटवृक्षाजवळ पूजेचे ताट घेऊन अनवाणी पायाने पोहोचल्या. कडक उन्हाळा लक्षात घेता सरस्वतीनगरात छोट्या वटवृक्षाची पूजा करून वटसावित्री हा सण घरीच साजरा केला.पूजा करतेवेळी अनुसया चौधरी, संगीताताई वराडे, प्रतिभाताई प्रधान व भावनाताई पराडकर यांनी सरस्वतीनगर येथील रहिवाशी उखंडराव चौधरी यांच्या घरातील वटवृक्षाची मनोभावाने पूजा केली.