गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मातीच्या मूर्तींची वाढली मागणी

0

 

अमरावती- यंदाच्या गणेश उत्सवासाठी मूर्तिकार सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. मूर्ती बनविण्याचा हा व्यवसाय आमचा पारंपारिक आहे. हा व्यवसाय आमच्या चार ते पाच पिढ्यांपासून सुरु आहे, असे मूर्तिकार संतोष चिल्लोकर यांनी सांगितले. मूर्तिकारांकडून मूर्ती घडवण्याचं काम जानेवारी महिन्यापासून सुरु होतं. गणपतीच्या लहान मूर्ती या सगळ्या मातीच्याच असतात. चार ते पाच फुटापासून या सगळ्या पीओपीच्या मूर्ती बनविल्या जातात. आणि अमरावतीकरांनी मातीच्या गणपतीला गेल्यावर्षी चांगली पसंती दिल्याने, यंदा 70 हजार मातीच्या श्रीमूर्ती घडविण्याच काम सुरू झाले. अमरावतीच्या एमआयडीसी, गोपाल नगर आणि कुंभारवाडा या परिसरात मूर्ती घडविण्याच काम सुरू आहे. त्यामुळे यंदा गणेश भाविकांना मुबलक प्रमाणात, आकर्षक मातीच्या मूर्ती उपलब्ध होणार आहेत हे निश्चित.