मुंबई : इंडियन प्रिमिअर लिग अर्थात ‘आयपीएल’च्या 16 व्या हंगामाच्या थरार 31 मार्च ते 28 मे दरम्यान रंगणार आहे. (IPL Schedule Declared) आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेते गुजरात आणि चेन्नई यांच्यात होणार असून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर उद्घाटनाचा हा सामना होणार आहे. 21 मेपर्यंत लीग सामने होणार असून त्यानंतर उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत. तर 28 मे रोजी अहमदाबाद येथे फायनलचा सामना रंगणार आहे. या स्पर्धेत एकून 74 सामने होतील. लीग राऊंडमध्ये दहा संघ प्रत्येकी 14-14 सामने खेळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. देशभरातील 12 मैदानावर सामने होणार आहेत. प्रत्येक संघाचे सात सामने घरच्या मैदानावर होतील, असे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे.
यंदा आयपीएलमध्ये सहभागी दहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. पहिल्या अ ग्रुपमध्ये मुंबई, राजस्थान, दिल्ली आणि लखनौ संघाचा सहभाग आहे. तर ब गटामध्ये चेन्नई, पंजाब, हैदराबाद, आरसीबी आणि गुजरात या संघाचा समावेश आहे. मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघाला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहे.
या शहरांमध्ये होणार सामने : अहमदाबाद, मोहाली, लखनौ, हैदराबाद, बेंगलोर, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी, धर्मशाला.