अजितदादा पवार मुख्यमंत्री झाल्यास आश्चर्य वाटणार नाही – एकनाथ खडसे

0

 

जळगाव – उपमुख्यमंत्री अजित पवार याना अर्थ खातं मिळण्यावरून शिंदे गटातील आमदारात नाराजी आहे. दहा दिवसापासून राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र खाते वाटप झालेलं नाही.गेल्यावेळी अजित दादांकडे अर्थ खात्यावरुन शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांच्या तक्रारी होत्या ते अस्वस्थ होते. पुन्हा अजित दादांना तेच खात दिल जात असेल तर त्यामुळेच शिवसेना शिंदे गटाचे आमदारांमध्ये नाराजीचा सूर दिसतो आहे. भविष्यात शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदास धोका असून अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास आश्चर्य वाटायला नको,असे मत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे बरेच आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. अनेक आमदार सांगत आहेत की मी मंत्री होणार आहे मी पालकमंत्री होणार आहे .काहीजण म्हणत आहेत मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता माझा शपथविधी ठरलेला आहे. प्रत्येकाला मंत्रीपद हवं आहे प्रत्येक जण मंत्री मंडळात जाण्यासाठी इच्छुक आहे.त्यामुळे या दोन्ही गोष्टींवरून मंत्रिमंडळ विस्ताराने खाते वाटपानंतर नाराजी ही उफाळून येणारच आहे. दुसरीकडे भाजपच्याही आमदारांमध्ये नाराजी आहे. मात्र ते त्यांच्यातील नाराजी बाहेर बोलत नाहीत. बाकीचे जसे उघडपणे बोलतात. ते बोलत नाहीत .भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळे भाजपमधील अनेक आमदार माझ्याशी बोलताना नाराजी व्यक्त करतात. राष्ट्रवादीला सोबत घेण्याच्या निर्णया विरोधात ते नाखुश असल्याचे सांगतात. त्यामुळे आज ना उद्या या परिस्थितीचा परिणाम जो दिसेल तो या तिघा पक्षांसाठी अनुकूल असेल असं वाटत नाही.भविष्यात काय होईल ते आज सांगता येत नाही मात्र सध्या राज्यात जो घाणेरडा प्रकार सुरू आहे. जे किळसवाणे राजकारण यापूर्वी महाराष्ट्राने कधी पाहिलेलं नाही.दरम्यान, काँग्रेस फुटणार का, याबाबत बोलताना कर्नाटकच्या निवडणुका जिंकल्यामुळे काँग्रेसमधून कोणी जाईल असे चित्र सध्या तरी दिसत नाही. कर्नाटक विजयामुळे उलट काँग्रेसच्या आमदारांमध्ये उत्साह आहे.काही महिन्यांसाठी काँग्रेसमधून कोणी तिकडे जाईल असं मला वाटत नाही. भाजपवाले नेहमी अफवा पसरवित राहतात. भाजप सध्या सत्तेसाठी हापापलेली दिसतेय.पक्ष फोडणे हेच प्रथम कर्तव्य देवेंद्र फडणवीस यांचे दिसत आहे. स्वतःच्या पक्षावर लक्ष देण्यापेक्षा फोडाफोडीच्या राजकारणावर देवेंद्र फडणवीस यांनी अधिक लक्ष दिलं आहे. त्यामुळे काँग्रेस फोडता येईल का अपक्ष फोडता येईल का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडता येईल का असं तोडफोडीचे राजकारण आहे. भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून हे योग्य नाही. एखादवेळेस एकनाथ शिंदे हे अपात्र झाल्यास त्यांच्या जागी अजित पवार हे मुख्यमंत्री झाल्यास आश्चर्य वाटणार नाही