मौन बाळगले, पण पाठीवरच्या जखमांनी फोडली वाचा

0

अकोल्यात पुढे आलेल्या घटनेने कुटुंब हादरले

अकोला. अल्पवयीन मुलीगी कोवळ्या वयात नको त्या घटनेला बळी पडली. घरच्यांचा विचार करून तिने मौन बाळगले होते. तब्बल १५ दिवसांनंतर पाठीवरच्या जखमांकडे आजीचे लक्ष गेले. तिने विश्वासात घेऊन तिची चौकशी केली. मुलीनेही आतापर्यंत मनात साठवून ठेवलेले गुपीत डोळ्यात पाणी आणत उलगडले. हा प्रकार ऐकून कुटुंब चांगलेच हादरले. लागलीच मुलीसह पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने गुन्हा दाखल करून घेत आरोपीला अटक (accused was arrested) केली. हा संपूर्ण घटनाक्रम अकोला शहरातील उमरी (Umri in Akola city ) परिसरातील आहे. येथ वास्तव्यास आसणाऱ्या एका १३ वर्षीय मुलीच्या पाठीवर आजीला जखमा दिसल्या. आजीने विचारणा केली असता २६ वर्षीय विवाहित युवकाने १५ दिवसांपूर्वी बळजबरीने अत्याचार केला (Forcible rape) आणि कुठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. भीतीपोटी कुणालाही काहीही सांगितले नसल्याचे ती म्हणाली.
मोठी उमरी भागात राहणारी १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीबरोबर १५ जानेवारीला रात्री रस्त्याने घरी जात असताना तिच्याच ओळखीतील एक २६ वर्षीय तरुण तिथे आला. घरी सोडून देण्याचा बहाण्याने तिला सोबत नेले. उमरीतील स्मशानभूमिच्या मागच्या बाजूला नेऊन तिच्यावर आरोपीने बलात्कार केला. आरोपीने अल्पवयीन मुलीला कुटुंबीयांसह ठार मारण्याची धमकी दिली. मुलीने भीतीपोटी हा प्रकार कुणाला सांगितला नाही. तब्बल १५ दिवस दिने हा प्रकार कुणालाही कळू नये म्हणून काळजी घेतली होती. पण, आजीला मुलीच्या अंगावर तसेच पाठीवर जखमा दिसून आल्या. यासंदर्भात आजीने तिला विचारणा केल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला. कुटुंबीयांनी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या प्रकरणी भादंवि कलम ३७६, ३५४ सह बाल संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून आरोपीला अटक केली आहे. गत महिन्यात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा आता ही घटना समोर आल्याने अकोला शहर हादरले आहे